• क्रेडिट कार्ड युटिलिटी बिल
    आज १ मे पासून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांवरील बोजा वाढणार असून येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेने आजपासून क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी बिले भरण्यासाठी ग्राहकांना १% अतिरिक्त शुल्क भरावे लागतील असे यापूर्वीच जाहीर केले होते. तसेच, येस बँकेसाठी १५ हजार रुपये आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेसाठी २० हजार रुपये विनामूल्य पेमेंटची मर्यादाही जाहीर करण्यात आली.

 

  • विमानतळ लाउंज प्रवेश
    तुम्ही IDFC फर्स्ट सिलेक्ट क्रेडिट कार्ड वापरत असल्यास पासून तुम्हाला प्रत्येक तिमाहीत ४ ऐवजी फक्त दोन विनामूल्य लाउंज प्रवेश मिळेल.

 

  • आयसीआयसीआय बँक सेवा
    आज पासून आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी अनेक सेवा महागणार आहेत. डेबिट कार्डसाठी ग्राहकांना २०० रुपये वार्षिक शुल्क द्यावे लागतील जे ग्रामीण भागात वर्षाला ९९ रुपये आहे. याशिवाय चेकबुक आणि IMPS साठीही जास्त शुल्क भरावे लागणार आहे.

 

  • किमान खाते शिल्लक
    येस बँकेच्या ग्राहकांना आता त्यांच्या बचत खात्यात किमान २५,००० रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. ही मर्यादा वेगवेगळ्या बचत खात्यांसाठी वेगळी असून १ मेपासून ग्राहकांसाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे.