• हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • दुसरीकडे उत्तर कोंकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
  • उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
  • विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
  • मुंबईबाबत बोलायचे झाल्यास पुढील 24 तास मुंबईत हवामान ढगाळ राहणार असून, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.