पुढील ४ दिवस राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

 

पुढील ४ दिवस या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट होणार मुसळधार पाऊस
➡️ येथे क्लिक करून पहा ⬅️

 

Monsoon Maharashtra : राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झालं आहे. आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

 

पुढील ४ दिवस या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट होणार मुसळधार पाऊस
➡️ येथे क्लिक करून पहा ⬅️

 

काल (सोमवारी) रात्री उशिरापर्यंत मान्सूनने अर्धा महाराष्ट्र गाठला असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापणार, असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात १ ते १० जून दरम्यान सरासरी २०.१ मिलिमीटर पाऊस पडतो. यातील बहुतांश पाऊस पूर्वमोसमी असतो. १० ते १५ जूननंतर राज्याच्या बहुतांश भागात मॉन्सूनच्या सरींना सुरुवात होते. या वर्षी मध्य महाराष्ट्र, विदर्भात पूर्व मोसमी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

 

पुढील ४ दिवस या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट होणार मुसळधार पाऊस
➡️ येथे क्लिक करून पहा ⬅️

 

त्यामुळे जूनच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये राज्यात ४४.९ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या तुलनेत १२४ टक्के जास्त पाऊस पडला. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) राज्यातील घोडदौड सोमवारीही कायम राहीली. पुढील दोन दिवसांमध्ये राज्याच्या उर्वरित भागात मॉन्सून सलामी देईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांमध्ये ४४.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत १२४ टक्के जास्त पाऊस पडल्याची माहितीही खात्यातर्फे देण्यात आली.

Leave a Comment